लंडन – इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये चार शतके फटकावलेल्या भारताच्या चेतेश्वर पुजाराने आयपीएल स्पर्धेत मला कोणत्याही संघाने घेतले नाही व त्यामुळे या स्पर्धेत खेळता आले नाही हे चांगलेच झाले, असे वक्तव्य केले आहे.
जर मला आयपीएल स्पर्धेत कोणत्या संघाने खरेदी केले असते तर मला अंतिम 11 खेळाडूंच्या संघात फारशी संधीही मिळाली नसती. त्यापेक्षा मी इंग्लंडला जाऊन काउंटी क्रिकेट खेळलो तेच माझ्यासाठी लाभदायक ठरले व मी भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करू शकलो, असेही पुजाराने म्हटले आहे.
दरम्यान, चेतेश्वर पुजाराला गेल्यावेळी म्हणजे आयपीएल 2021 रोजी चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात घेतले होते, मात्र त्याला एकदाही मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही. यंदा म्हणजे आयपीएल 2022 मध्ये तर त्याच्यासाठी बोली लावण्यासही कोणता संघ उत्सुक नव्हता आणि कोणत्याही संघाने त्याला खरेदी देखील केले नाही.