बेंगळुरू – भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्त्रोच्या या वर्षातील पहिल्या प्रक्षेपण मोहिमेत पृथ्वी निरीक्षण उपग्रह अवकाशात सोडाला जाणार आहे. या प्रक्षेपणाचे 25 तासांचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. पीएसएलव्ही यानातून हे प्रक्षेपण केले जाणार असून त्यात अन्य दोन लहान उपग्रहही असणार आहेत.
श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ प्रक्षेपण केंद्रावरून सोमवारी पहाटे 5 वाजून 59 मिनीटांनी हे प्रक्षेपण होणार आहे. पृथ्वीच्या निरीक्षणासाठी जो ईओएस – 04 हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे त्याचे वजन 1710 किलो इतके असणार आहे. पृथ्वीपासून 529 किमी उंचीवरील कक्षेत तो स्थीर केला जाणार आहे.या उपग्रहाचा वापर कृषी, वनीकरण, मातीचा ओलावा, जलविज्ञान, आणि पुराची स्थिती याची माहिती मिळवण्यासाठी केला जाणार आहे.
.