जेरूसलेम – इस्त्रायलमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या संघर्षात जखमी झालेले इस्त्रायलच्या अंतरीक्ष संशोधन संस्थेचे माजी प्रमुख अवि हर ईव्हन यांचे आज रुग्णालयातच निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.
दंगलीच्या काळात ते ज्या हॉटेलमध्ये वास्तव्याला होते ते हॉटेल अरब निदर्शकांनी जाळून टाकले त्यात ते गंभीर जखमी झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी 1995 ते 2004 या काळात इस्त्रायलच्या अंतरिक्ष संशोधन संस्थेचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.
अरब आणि इस्त्रायली नागरिकांमध्ये गेल्या महिन्यात अनेक शहरांमध्ये मोठ्याप्रमाणावर सशस्त्र संघर्ष झाला होता. त्यातूनच पुढे इस्त्रायल आणि हमास यांच्यात 11 दिवसांचे युद्ध उद्भवले होते. या संघर्षाच्या काळात अरब नागरीकांनी ज्यू वस्तींवर मोठ्या प्रमाणात हल्ले केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्या दंगलीचे ईव्हन हे बळी ठरले आहेत.