Israel-Hamas War : मध्यपूर्वेतील इस्रायल (Israel) आणि पॅलेस्टाईन यांच्यातील परिस्थिती पुन्हा एकदा चिघळली आहे. हमासच्या (Hamas) दहशतवाद्यांनी शनिवारी गाझा पट्टीवर हल्ला करत फक्त २ मिनिटात इस्रायलवर 5000 रॉकेट डागले असल्याची माहिती समोर आली होती. नंतर जमिनीवरून सतत हल्ले करत त्यांनी इस्रायलमध्ये प्रवेश केला.दरम्यान, या युद्धात आतापर्यंत तब्बल १६०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
हमास (Hamas) आणि इस्रायलमध्ये (Israel) सुरू असलेल्या युद्धादरम्यान गाझा आणि वेस्ट बँकमध्ये एकूण 704 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 2,616 लोक जखमी झाले आहेत. तर इस्रायलमध्ये 900 लोकांचा मृत्यू झाला असून 3800 लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, हमासने (Hamas)शेकडो इस्रायली नागरिकांचे अपहरण केले असून अनेकांची हत्याही केली आहे.
तर हमासने (Hamas) इस्रायलला (Israel) ओलिसांना ठार मारू अशी धमकी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक मोठं वक्तव्य करून हमासला (Hamas) उत्तर दिलं आहे. हे युद्ध आम्ही सुरू केलं नसलं तरी या युद्धाचा शेवट आम्हीच करू, असा इशारा नेतन्याहू यांनी दिला आहे. हमासचा (Hamas) प्रवक्ता अबू उबैदा याने इस्रायला (Israel) धमकी दिली आहे की, गाजा पट्टीतल्या नागरिकांवर इस्रायलने (Israel) हल्ला केल्यास कोणत्याही क्षणी आम्ही ओलिसांना ठार करू. असे त्याने म्हटले आहे.
दरम्यान, हमास (Hamas) आणि इस्रायलमध्ये (Israel) सुरू असलेल्या युद्धादरम्यान युएईनेही इस्रायलला युद्धात साथ दिली. युएई हा एकमेव इस्लामिक देश आहे ज्याने युद्धात इस्रायलला पाठिंबा दिला आहे. याशिवाय अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि भारत या देशांनी इस्रायलला(Israel) पाठिंबा दिला आहे.