Hamas rockets misfiring : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला गुरुवारी 13 दिवस झाले आहेत. या युद्धात दोन्ही बाजूंनी हजारो लोक मारले गेले आहेत. गाझा पट्टीत मृतदेहांचा ढीग आहे. अशा स्थितीत इस्रायलने हमासवर अत्यंत गंभीर आरोप केले असून ते आपल्याच लोकांना मारण्यात व्यस्त असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेतील इस्रायली दूतावासाचे म्हणणे आहे की, 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यापासून गाझामधील पॅलेस्टिनी दहशतवादी गटाने इस्रायलवर 7000 हून अधिक रॉकेट डागले आहेत. या 7000 रॉकेटपैकी 400 हून अधिक मिसफायर झाले आणि गाझामध्ये पडले.
हे या नकाशात स्पष्टपणे दिसत आहे. रॉकेट डागून हमासचा इस्रायलींना मारण्याचा उद्देश होता. याद्वारे त्यांनी पॅलेस्टिनी नागरिकांना संकटात टाकले. एक प्रकारे हा दुहेरी युद्ध गुन्हा आहे.
गाझा रुग्णालयावरील हवाई हल्ल्यावरून वाद –
अलीकडेच गाझा येथील हॉस्पिटलवर हवाई हल्ला झाला होता, ज्यामध्ये 500 लोक मारले गेले होते. इस्रायलच्या लष्करावर हवाई हल्ल्याचा आरोप हमासने केला आहे. दुसरीकडे, या हल्ल्यामागे पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचा हात असल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे.
या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले जात आहेत. इंडिया टुडेच्या OSINT टीमने या फोटो आणि व्हिडिओंचे विश्लेषण केले जेणेकरून काही अंदाज बांधता येतील. बहुतेक व्हिज्युअल्स दाखवतात की हा हल्ला एक दुर्घघटना आहे. हे टार्गेट करून झालेले नाही. व्हिज्युअल पाहून हे स्पष्ट होते की, रॉकेट लाँचर निकामी होऊन हॉस्पिटलवर पडले.
अल-अहली अल-अरबी रुग्णालयावरील हल्ल्यानंतर काढलेली छायाचित्रे पाहिल्यास असे दिसून येते की, पार्किंग आणि आजूबाजूचा परिसर त्याच्या सर्वात जवळ होता.
युद्ध कसे सुरू झाले?
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचा गुरुवार हा 13 वा दिवस आहे. 7 ऑक्टोबर रोजी पॅलेस्टिनी शस्त्र समूह हमासने गाझा पट्टीतून रॉकेट हल्ल्यांची मालिका सुरू केली. हे हल्ले इस्रायलवर करण्यात आले. हमासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून याला इस्रायलविरोधातील लष्करी कारवाई म्हटले आहे. हमासने सुमारे 20 मिनिटांत गाझा पट्टीतून 5,000 रॉकेट डागले. एवढेच नाही तर इस्रायलमध्ये घुसखोरी करून काही लष्करी वाहने ताब्यात घेण्यात आली. या युद्धात दोन्ही बाजूंचे शेकडो लोक मरण पावले आहेत.
7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या युद्धानंतर गाझामध्ये सात दिवसांत 22 हजारांहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. इस्रायलने 10 रुग्णालये आणि 48 शाळांवर बॉम्बफेक केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार गाझामधील तीन लाखांहून अधिक लोकांना घरे सोडण्यास भाग पाडले गेले आहे.