Israel Gaza Attack : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान भारताने पॅलेस्टिनींना मानवतावादी मदत पाठवली आहे. भारतीय हवाई दलाचे C-17 विमान सुमारे 6.5 टन वैद्यकीय आणि 32 आपत्ती निवारण वस्तू घेऊन इजिप्तच्या अल-अरिश विमानतळाकडे रवाना झाले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी रविवारी ही माहिती दिली.
अरिंदम बागची यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे. भारताने पाठवलेल्या मदत सामग्रीमध्ये जीवनरक्षक औषधे, शस्त्रक्रियेच्या वस्तू, तंबू, स्लीपिंग बॅग , ताडपत्री, स्वच्छता सुविधा, पाणी शुद्धीकरण गोळ्या आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.
🇮🇳 sends Humanitarian aid to the people of 🇵🇸!
An IAF C-17 flight carrying nearly 6.5 tonnes of medical aid and 32 tonnes of disaster relief material for the people of Palestine departs for El-Arish airport in Egypt.
The material includes essential life-saving medicines,… pic.twitter.com/28XI6992Ph
— Arindam Bagchi (@MEAIndia) October 22, 2023
गाझातील सध्याची परिस्थिती पाहता जगातील अनेक देशांनी पॅलेस्टिनींना मदत साहित्य पाठवण्याचे आवाहन केले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांना फोन करून सीमा खुली करण्याचे आवाहन केले होते जेणेकरुन तेथील लोकांना मदत करता येईल. यानंतर गाझामध्ये मानवतावादी मदतीचे सुमारे 20 ट्रक पोहोचवण्यात आले आहेत.
दरम्यान, भारताचे पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी, पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी चर्चा केली होती. यादरम्यान, पंतप्रधानांनी गाझाच्या अल अहली रुग्णालयात नागरिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला होता. उल्लेखनीय आहे की अल अहली हॉस्पिटलवरील हवाई हल्ल्यात सुमारे 500 लोकांचा मृत्यू झाला होता.