गुवाहाटी –इसिस इंडियाचा प्रमुख हॅरीस फारूकी याला बुधवारी आसाममध्ये अटक करण्यात आली. विशेष कृती दलाने (एसटीएफ) ती महत्वपूर्ण दहशतवादविरोधी कारवाई केली. बांगलादेशमध्ये तळ ठोकून असणाऱ्या फारूकीला भारतीय हद्दीत शिरकाव केल्यानंतर साथीदारासमवेत पकडण्यात आले. (ISIS India Head, Key Aide Arrested In Major Op In Assam’s Dhubri)
अनुराग सिंह उर्फ रेहान असे फारूकीच्या साथीदाराचे नाव आहे. इसिस या खतरनाक दहशतवादी संघटनेचे जाळे भारतात पसरवण्याची कामगिरी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.
दहशतवाद्यांची भरती करणे, दहशतवादासाठी पैसा गोळा करणे, आयईडी स्फोटकांच्या माध्यमातून देशभरात स्फोट घडवणे आदी जबाबदाऱ्या त्यांना देण्यात आल्या होत्या. फारूकी आणि त्याच्या साथीदाराला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवले जाणार असल्याचे समजते.