पुणे – साडी हा प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय त्यातून साडी खरेदी असा विषय निघाला की, साडी कशी घ्यायची? पॅटर्न कोणता? इथपासून ते बारीक काठ कि मोठे? भरजरी पदर अशा अनेक गोष्टी मनाचा ताबा घेतात. आणि मग जो पर्यंत मनाला भावेल अशी साडी मिळत नाही तो पर्यंत साडी चा शोध चालूच राहतो.
आता तुम्हाला हवी तशी तुमच्या मनातली साडी मिळावी यासाठी स्वामिनी साड्यांची महाराणी घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास ‘इश्श सेल !’जिथे तुम्ही भरपूर साड्या खरेदी करू शकता कारण इथल्या असंख्य व्हरायटीज आणि फ्रेश स्टॉक वर 10 ते 50% पर्यंतची घवघवीत सूट देत आहे.
नऊवारी व स्पेशल शाही पैठणीसह, फॅन्सी, डिझाइनर्स व ट्रेडिशनल साड्यांची मनपसंत खरेदी करण्याची हि सुवर्ण संधी आता थोडेच दिवस शिल्लक आहे. तसेच लग्नबस्त्यासाठी आणि देण्या घेण्याच्या साड्यांसाठी खास सोय आहे. स्वामिनीचे संस्थापक रियाज शेख (अब्बू) यांनी गेल्या अनेक वर्षापासून जोडलेली माणसे त्यांचे दोन्ही चिरंजीव जावेद आणि नावेद तितक्याच आपलेपणाने हा वारसा पुढे चालवत आहेत.
आपल्या इतिहासातील कर्तबगार महिलांना वंदन करत त्यांच्या नावाच्या साड्या स्वामिनीने उपलब्ध करून दिल्या आहेत, निवृत्त होणाऱ्या शिक्षिकेला गुरुदेवता साडी, महिला पोलिसांना अष्टभुजा साडी तर दुकानात येणाऱ्या ८० वर्षांपुढील प्रत्येक स्त्रियांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करणारे स्वामिनी हे देशातील पहिलेच दुकान आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वामिनीचे बरेच यशस्वी उपक्रम चालू आहेत, सोशल मीडिया मार्फत वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येतात त्यामध्ये असंख्य महिला उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात.
तसेच यु ट्युब व आकाशवाणी पुणे केंद्रावर स्वामिनीच्या वाटचालीचा रोमहर्षक प्रवास सांगणारी ‘स्वामिनीची यशोगाथा’ हि मालिका देखील सुरु आहे. संपूर्ण देशभरातील विविध प्रांताच्या, विविध प्रकारच्या साड्या पुण्यात एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने चोखंदळ आणि रसिक ग्राहकांच्या विश्वासाचे आणि आपुलकीचे ठिकाण पुण्याच्या कुमठेकर रोड वरील एकमेव दालन म्हणजेच स्वामिनी साड्यांची महाराणी.