IRCTC kashmir tour package: काश्मीर हे पृथ्वीवरील स्वर्ग असल्याचे म्हंटले जाते. जेव्हा तुम्ही काश्मीरचे सौंदर्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहता तेव्हा ही गोष्ट पूर्णपणे खरी ठरते. जर तुम्हालाही काश्मीरच्या सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल, तर IRCTC ने तुमच्यासाठी खास पॅकेज आणले आहे, जे कमी किमतीचे आणि पूर्ण पॅकेज देखील आहे.
कधी आहे हा दौरा –
काश्मीरसाठीच्या या पॅकेजचे नाव जन्नत-ए-काश्मीर आहे आणि त्याच्या प्रस्थानाची तारीख पुढील वर्षी 12 मार्च आहे. या पॅकेजमध्ये श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग आणि पहलगाम स्थानांचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये पाटणा ते दिल्ली नंतर श्रीनगर आणि परत श्रीनगर ते दिल्ली आणि पाटणा असा प्रवास केला जाईल.
Bathe in the breathtaking beauty of #Kashmir with #IRCTCTourism's 6D/5N scenic air tour package starting at Rs. 26,310/-pp* only. To know more, visit https://t.co/nhn4UfyfA9 *T&C Apply
— IRCTC (@IRCTCofficial) December 21, 2021
असा असेल प्रवास –
5 रात्री आणि 6 दिवसांच्या या पॅकेज अंतर्गत, 12 मार्च ते 17 मार्च दरम्यान, तुम्हाला काश्मीरच्या अतुलनीय सौंदर्याचा आनंद घेता येणार आहे. पहिल्या दिवशी, पाटणा विमानतळावरून सुरुवात होईल. फ्लाइट क्रमांक 6E -2163/124 सकाळी 8.25 वाजता निघेल आणि दुपारी 2.30 वाजता श्रीनगरला पोहोचेल. रात्र हॉटेलमध्ये काढावी लागेल आणि पहिल्याच दिवशी तुम्ही स्वखर्चाने दल लेकमध्ये शिकारा राइडचा आनंद घेऊ शकता. दुसऱ्या दिवशी तुम्ही श्रीनगरला भेट द्याल, ज्यामध्ये तुम्ही निशात गार्डन, चश्मेशाही आणि शालीमार गार्डनला भेट देऊ शकाल. त्याच दिवशी शंकराचार्य मंदिरात दर्शन होईल. आणि श्रीनगरमधील हॉटेलमध्ये रात्री मुक्कमा असेल.
तिसरा दिवस गुलमर्ग टूरमध्ये जाईल. येथे तुम्हाला सर्वात उंच गोल्फ कोर्स पाहता येईल. घोडेस्वारी किंवा केबल कार राईड स्वखर्चाने करता येते. रात्री श्रीनगरच्या हॉटेलमध्ये परत यावे लागेल. तुम्ही चौथ्या दिवशी पहलगाम आणि पाचव्या दिवशी सोनमर्गला भेट देऊ शकाल. शेवटच्या सहाव्या दिवशी, तुमची फ्लाइट पाटण्याला 1:5 वाजता निघेल आणि संध्याकाळी 5:45 वाजता पाटण्याला पोहोचेल.
इतकी असेल टूर पॅकेजची किंमत –
यामध्ये सिंगल ऑक्युपन्सीसाठी 34020 रुपये आणि डबल ऑक्युपन्सीसाठी 27030 रुपये खर्च लागेल. ट्रिपल ऑक्युपन्सी ज्यामध्ये एका मुलाचा समावेश असेल (5 वर्षे ते 11 वर्षे) आणि त्याच्या बेड कॅटेगरीसाठी तुम्हाला 26310 रुपये द्यावे लागतील. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलासाठी, बेडशिवाय श्रेणीसाठी 22870 रुपये खर्च करावे लागतील. 2 ते 4 वर्षे वयोगटातील मुलासाठी, बेड नसलेल्या श्रेणीसाठी एकूण खर्च 18180 रुपये आहे.