Kashmir Tour Package from IRCTC : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसीन) पर्यटकांसाठी काश्मीर हेवन ऑन अर्थ हे टूर पॅकेज जाहीर केले आहे. काश्मीर मधील सौंदर्य अनुभवण्यासाठी ज्या पर्यटकांना जायचे आहे, अशांसाठी आयआरसीटीसीने नुकतेच एक पॅकेज जाहीर केलेले आहे. हेवन ऑन अर्थ असे या पॅकेजचे नाव आहे. या पॅकेजमध्ये गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर अशा लोकप्रिय ठिकाणांना भेटी देता येतात. हे पॅकेज पाच रात्री आणि सहा दिवसांसाठी आहे.
काश्मीर हे पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय असे ठिकाण आहे. विशेषतः उन्हाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने काश्मीरला जात असतात. काश्मीर मधील सुंदर अशी नद्यांची खोरी, बर्फाच्छादित डोंगररांगा, वन्य प्राणी जीवन आणि स्थानिक कलाकुसर आणि कलेच्या वस्तू प्रसिद्ध आहेत. गेल्या काही वर्षात या राज्यांमध्ये झालेल्या विकासामुळे देखील इथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झालेली आहे. | Kashmir Tour Package from IRCTC
मुंबईहून श्रीनगर पर्यंत आणि पाच पाच रात्री व सहा दिवस आणि परत मुंबई असे हे पॅकेज आहे. मुंबई ते श्रीनगर पर्यंत आणि परतीचे फ्लाईटचे तिकीट हॉटेलमधील निवास जेवण आणि पर्यटक विमा अशा गोष्टींच्या खर्च या पॅकेज मध्ये धरण्यात आलेला आहे. किती जणांचा ग्रुप आहे त्यावर पॅकेज मधील व्यक्तीगणिक खर्च कमी होत जातो. तुम्ही या पॅकेजसाठी आयआरसीटीसी च्या अधिकृत संकेतस्थळावरूनही बुकिंग करू शकता. तसेच अन्य टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर आणि आयआरसीटीसीच्या कार्यालयांमधूनही याचे बुकिंग होऊ शकते. | Kashmir Tour Package from IRCTC
एकट्या पर्यटकांसाठी या ट्रिपचा खर्च आहे रुपये 58 हजार ५००. दोघा पर्यटकांसाठी या पॅकेजच्या खर्च आहे 49 हजार 600 रुपये प्रति व्यक्ती. तीन जणांचा ग्रुप असेल तर या सहलीचा खर्च प्रतिव्यक्ती 46 हजार 300 रुपये येतो. पाच ते अकरा वर्षाच्या वयोगटातील मुले असतील तर अशा मुलांसाठी बेड सहित 44000 व विदाऊट बेड 38 हजार ५०० रुपये खर्च येतो. | Kashmir Tour Package from IRCTC