अहमदाबाद – शिखर धवनच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्स संघावर सात विकेट आणि १४ चेंडू राखून सहज विजय मिळवला. शिखर धवनने ४७ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ६७ धावा केल्या.
नियमीत कर्णधार लोकेश राहुलच्या गैरहजेरीत प्रथम फलंदाजाला आलेल्या पंजाब संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १६६ धावा केल्या. यामध्ये कर्णधार मयंक अग्रवालने ५८ चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ९९ धावा केल्या. तर डेविड मालानने २६ धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून कगिसो रबाडाने तीन विकेट घेतल्या.
प्रत्युत्तर फलंदाजीला आलेल्या दिल्ली संघाने १७.४ षटकांत ३ बाद १६७ धावा करून विजयाची नोंद केली. धवनच्या अर्धशतका व्यतिरिक्त पृथ्वी शॉने ३९ तर स्टीव्हन स्मिथने २४ धावांचे योगदान दिले. पंजाबकडून हरप्रीत ब्रार, ख्रिस जॉर्डन आणि रिले मेदर्दीथ यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.