बंगळुरू, दि. 2 – कर्नाटकमध्ये झालेल्या तीन मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने दोन जागांवर विजय मिळवला. तर कॉंग्रेसने एक जागा मिळवली.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार मंगला सुरेश अंगडी या अवघ्या दोन हजार 903 मतांनी विजयी झाल्या. माजी रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक लढवली गेली. तेथे सतीश जरकीहोळी यांनी चांगली लढत दिली.
बिदर जिल्ह्यातील बसवकल्याण येथे भाजपाचे शरणु सलगर विजयी झाले. तर रायचूर जिल्ह्यात मस्की विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे बसवगोंडा तुरविहाळ विजयी झाले. येथे भाजपाचे आमदार नारायण राव यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.