“बेलबॉटम’ही ओटीटीवर रिलीज करण्याची तयारी सुरू

मुंबई – करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरातील उद्योगधंद्यांवर जसा परिणाम झाला, तसाच तो फिल्म इंडस्ट्रीजवरदेखील झाला आहे. गेल्या वर्षभरापासून कोणताही नवीन सिनेमा रिलीज होऊ शकलेला नाही.

अनेक सिनेमांचे शूटिंग रखडले आहे. बहुतेक सिनेमांचे रिलीज पुढे ढकलले गेले आहे, तर काही महत्त्वाचे सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची घोषणा केली जाऊ लागली आहे.

अलीकडेच सलमान खानचा “राधे’ आणि कंगना रणावतचा “थलायवी’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची घोषणा केली गेली आहे. त्यामुळे अक्षय कुमारचा “बेलबॉटम’देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याची तयारी सुरू झाली आहे. 

“बेलबॉटम’ 28 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र, सध्याच्या घडीला देशातील करोनाचे वातावरण पाहता जुलैपर्यंत ही परिस्थिती सुधारेल आणि “बेल बॉटम’ थिएटरमध्ये शक्‍य होईल, असे वाटत नाही. 

त्यामुळे निर्मात्यांनी अमेझॉन प्राईम आणि हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मशी चर्चा सुरू केली आहे. सिनेमाचे हक्क विकायला या दोघांपैकी जो अधिक पैसे देईल, त्याला पसंती दिली जाईल. या दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये सध्या “बेलबॉटम’च्या अधिकारांवरून रस्सीखेच आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.