अबुधाबी – आयपीएलच्या पहिल्या सलामिच्या सामन्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. हीच उत्सुकता बार्कच्या सर्वेक्षणात दिसून आली. बार्कच्या सर्वेक्षणानुसार सामना जवळ – जवळ 20 कोटी लोकांनी पाहिला. आतापर्यंत झालेल्या इतर देशातील स्पर्धेला दिलेल्या पाठिंब्याच्या तुलनेत, जास्त पाहिला गेला आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेने पहिल्या दिवशी विश्वविक्रम प्रस्थापित केला.
पहिला सामना दोन मजबूत संघात म्हणजेच चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सम्ध्ये रंगला. या दोन्ही संघाचे चाहते प्रचंड प्रमाणात आहे. हा सामना अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर पार पडला. कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणुन सामना प्रेक्षकांवीना रिकाम्या मैदानावर झाला. त्यामुळे सर्व चाहत्यांनी हा सामना टीव्ही अणि डिजिटल साधनावर पाहिला गेला.
Thank you, India 🇮🇳 and 🌏🌎🌏. It’s been a dream start to #Dream11IPL. We’ve recorded highest ever TV & DIGITAL viewership in IPL history
200 million viewership – #MIvCSK@ChennaiIPL @DelhiCapitals @lionsdenkxip @KKRiders @mipaltan @rajasthanroyals @RCBTweets @SunRisers
— IndianPremierLeague (@IPL) September 22, 2020
याबाबतची माहिती आयपीएलच्या ऑफिशीयल अकाऊंटवर” भारत अणि जगाला धन्यवाद.. ड्रीम 11 ड्रीम स्टार्ट.” असे ट्विट करून देण्यात आली.