मुंबई – आयपीएल 2022 च्या 66 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट संघाच्या के एल राहुल आणि डी कॉक यांनी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ऐतिहासिक खेळी खेळत एक मोठा विक्रम केला. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी केली, जी आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी आहे.
या दोघांनी मिळून केकेआरच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. डी कॉकने धमाकेदार फलंदाजी करताना 70 चेंडूत 10 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने नाबाद 140 धावा केल्या. डी कॉकने ५९ चेंडूत शतक झळकावून धमाका केला आहे. डी कॉकचे आयपीएलमधील हे दुसरे शतक आहे. त्याने 2016 मध्ये RCB विरुद्ध IPL मध्ये पहिले शतक झळकावले होते.
राहुलने 51 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली, दोघांनी 210 धावांची भागीदारी करून केकेआरच्या गोलंदाजांना निष्प्रभ करून टाकलं. डी कॉक आणि राहुल यांनी धमाकेदार फलंदाजी जोरावर एलएसजी संघाने केकेआरसमोर विजयासाठी 211 धावांचे आव्हान ठेवलं.