IPL : कोच ३८ तर खेळाडू ४८ वर्षांचा
कोलकाता : पुढील वर्षी मार्चमध्ये आयपीलचे १३ वे पर्व सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काल कोलकात्यामध्ये भारतीय तसेच परदेशी खेळाडूंचा लिलाव पार पडला, यामध्ये एक फ्रँचाइझींने असा खेळाडू खरेदी केला ज्याचे वय संघाच्या मुख्य कोचच्या वयापेक्षा १० वर्षाने जास्त आहे. ज्यामध्ये संघाच्या मुख्य कोचचे वय ३८ वर्षे तर खेळाडूचं वय ४८ वर्षे आहे.
एकीकडे युवा खेळाडूंना ताफ्यात घेण्यासाठी चुरस रंगलेली असताना कोलकाता नाइट रायडर्सनं मात्र ४८ वर्षांच्या खेळाडूला आपल्या संघात घेतले. आयपीएलच्या इतिहासात तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. प्रविण तांबे असे या खेळाडूचे नाव असून त्याला कोलकातानं २० लाखांच्या मूळ किंमतीत आपल्या संघात घेतले आहे.
The experienced Pravin Tambe is SOLD to @KKRiders for 20L #IPLAuction
— IndianPremierLeague (@IPL) December 19, 2019
प्रवीण तांबे या ४८ वर्षीय फिरकीपटूनं आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्स, गुजरात लायन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रवीण तांबे याचे वय ४८ पेक्षा अधिक आहे. तर, संघाचे कोच ब्रेंडन मॅकलमचे वय ३८ वर्षे आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅकलमसुध्दा असा विचार करत असेल की आता त्यांना अशा खेळाडूला कोचिंग करायच जो त्यांच्यापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे.
KKr coach Brendon McCullum is 38. One of his players, Pravin Tambe is 48, a decade older. That's a great story and must be a record in professional sport!
— Joy Bhattacharjya (@joybhattacharj) December 20, 2019
२०१३ मध्ये ४२ वर्षाच्या वयात त्याने आयपीएलमध्ये खेळण्यास सुरुवात केली. आतापर्यंत तांबेने ३३ आयपीएल सामने खेळले आहेत. त्यासोबतच २८ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०१४ मध्ये त्याने रॉयल्ससाठी सातत्यपूर्ण कामगिरी बजावली आणि १३ सामन्यांमध्ये १५ विकेट घेत चांगली कामगिरी बजावली. त्याच्या १५ विकेट्समध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध हॅटट्रिकचाही समावेश होता.
प्रवीण तांबे २०१६ मध्ये सात सामने खेळले होता. २०१७ मध्ये हैद्राबाद संघाने तांबेला खरेदी केले होते. पण खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आयपीएल शिवाय, तांबेने मागील वर्षी अबु धाबी येथे टी-१० क्रिकेट लीगमध्ये प्रवेश केला होता आणि १० षटकांच्या क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज बनला. त्याच सामन्यात तांबे ने १५ धावांवर ५ गडी बाद केले होते.