IPL 2024 Live Cricket Score, SRH vs RCB : आज आयपीएल 2024 चा 41 वा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाणेफेक जिंकल्यानंतर आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 7 गडी गमावून 206 धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ही धावसंख्या गाठण्यात विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या अर्धशतकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. एकीकडे विराटने 43 चेंडूत 51 धावांची खेळी केली. तर पाटीदारने 20 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकारांसह 50 धावांची तुफानी खेळी केली. या डावात विराट कोहली आणि जयदेव उनाडकट यांच्यातील स्पर्धा पाहण्यासारखी होती. उनाडकटने SRH साठी शानदार गोलंदाजी करत एकूण 3 बळी घेतले. आता SRH ला विजयासाठी 207 धावा कराव्या लागतील.
Innings Break!#RCB set a 🎯of 2️⃣0️⃣7️⃣, with fifties from Virat Kohli & Rajat Patidar 👏👏
Don’t go anywhere as #SRH innings starts 🔜
Scorecard ▶️ https://t.co/2EpEyR3PF2#TATAIPL | #SRHvRCB pic.twitter.com/AZIeWFkdZQ
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2024
चौथे षटक संपण्यापूर्वीच विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी संघाची धावसंख्या 48 धावांवर नेल्याने आरसीबीसाठी ही चांगली सुरुवात होती. डु प्लेसिस हा 12 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. त्यानंतर विल जॅक्सही लगेचच माघारी परतला. तो केवळ 6 धावा करून बाद झाला. दरम्यान, विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्यातील 65 धावांच्या भागीदारीने आरसीबीचा डाव सावरला. 15 षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 142 धावा होती, पण येथून कॅमेरून ग्रीनचे वादळ आले. पुढच्या 3 षटकांत सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी 37 धावा दिल्या, त्यामुळे बेंगळुरू संघाने 18 षटकांत 179 धावा केल्या होत्या.
शेवटच्या 2 षटकांमध्येही आरसीबीचे फलंदाज आक्रमकपणे बॅट फिरवताना दिसले. SRH कर्णधार पॅट कमिन्सने पहिल्या 19व्या षटकात 15 धावा दिल्या, तर टी नटराजननेही शेवटच्या षटकात 12 धावा दिल्या. यासह 200 धावांचा टप्पा पार करण्यात आरसीबी संघाला यश आले. ग्रीनने 20 चेंडूत 37 धावा केल्या आणि शेवटच्या षटकांमध्ये स्वप्नील सिंगने 6 चेंडूत 12 धावांची छोटी खेळी खेळली. शेवटच्या 5 षटकात आरसीबीने 64 धावा काढल्या.
उनाडकट गोलंदाजीत चमकला…
सामन्याच्या सुरुवातीला एसआरएचची गोलंदाजी लयबाहेर असल्याचे दिसून आले. पॉवरप्ले षटकांतच संघाने 61 धावा दिल्या होत्या. मात्र, जयदेव उनाडकटची गोलंदाजी धारदार होती, त्याने 4 षटकांत 30 धावांत 3 बळी घेतले. कर्णधार पॅट कमिन्सने 1 बळी घेतला असला तरी त्याने 4 षटकात 55 धावा दिल्या. त्यांच्याशिवाय मयंक मार्कंडेने 1 आणि टी नटराजनने 2 बळी घेतले. शाहबाज अहमद 3 षटकात केवळ 14 धावा देत अतिशय कसून गोलंदाजी करताना दिसला.