IPL 2024, Live Cricket Score, RR vs MI : आज आयपीएल 2024 चा 38 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जात आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकात 9 गडी गमावून 179 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्समोर आता विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य असेल.
Yuzi bhai’s 200th IPL wicket and 5 for Sandeep coming off an injury! 👏💗 pic.twitter.com/nK25C0dsP4
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 22, 2024
नाणेफेक हारल्यानंतर मुंबई इंडियन्सने प्रथम खेळताना 179 धावा केल्या. एमआयची सुरुवात चांगली झाली नाही कारण संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज अवघ्या 6 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. या सामन्यात इशान किशनला एकही धाव करता आली नाही, तर दुसरीकडे रोहित शर्माने 6 धावा केल्या.
या सामन्यात सूर्यकुमार यादवची जादूही चालू शकली नाही कारण संदीप शर्माने त्याला 10 धावांवर बाद केले. 52 धावा झाल्या तोपर्यंत मुंबईने 4 विकेट गमावल्या होत्या, परंतु येथून निहाल वढेरा आणि तिलक वर्मा यांच्यातील शानदार 99 धावांच्या भागीदारीने मुंबई इंडियन्सला सामन्यात परत आणले. वढेराने 24 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 49 धावांची शानदार खेळी खेळली.
एकेवेळ मुंबई इंडियन्स 13 षटकांत 4 विकेट गमावून 101 धावांवर खेळत होती. येथून फलंदाजांनी तुफानी शैलीत फलंदाजी केली. 17व्या षटकात निहाल वढेरा बाद झाला असला तरी टिळक वर्माने आपली अर्धशतकी खेळी सुरूच ठेवली होती. 13व्या षटकानंतर पुढील 5 षटकांत संघाच्या 69 धावा झाल्या होत्या. मुंबई 200 धावा सहज पार करेल असे वाटत होते पण शेवटच्या 2 षटकात RR कडून तगडी गोलंदाजी झाली. पहिल्या 19 व्या षटकात आवेश खानने केवळ 6 धावा दिल्या आणि शेवटच्या षटकात संदीप शर्माने 3 धावा दिल्या आणि 3 विकेट्स घेऊन मुंबईला 179 धावांवर रोखले.
IPL 2024 : दाम कमी पण काम मोठे..! अवघ्या 20 लाखांत ‘हे’ खेळाडू करतायेत करोडोंची कामगिरी…
राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी…
राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना अडचणीत आणले होते. मुंबईने पहिल्या 4 विकेट 52 धावांत गमावल्या होत्या. मात्र आवेश खान आणि युझवेंद्र चहल यांची मधल्या षटकांमध्ये चांगलीच धुलाई झाली. आरआरसाठी संदीप शर्माने 4 षटकात 18 धावा देताना सर्वाधिक 5 आणि ट्रेंट बोल्टने 2 बळी घेतले. याच सामन्यात मोहम्मद नबीची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 200 विकेट पूर्ण केल्या आहेत, पण त्याने 4 षटकात 48 धावाही दिल्या आहेत. त्याच्याशिवाय आवेश खाननेही महत्त्वाची 1 विकेट घेतली.