Marathwada weather – बीड जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात राज्यभरातील सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाचा तडाखा बसला.
नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यातही दुपारी पारा ४० पेक्षा वर गेला आणि सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगरातही सायंकाळी पावसाचा शिडकावा झाला.
बीड, धाराशिव, नांदेड- मराठवाड्यात बुधवारी पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला. बीड तालुक्यातील पांढऱ्याचीवाडी शिवारात वीज कोसळून चार गुरे दगावली. सायंकाळी पाच वाजता जोरदार झाला.
बीड शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. भवानवाडीत ओढ्याला पूर आला. या अवकाळी पावसामुळे आंबा, टरबूज, गहू, ज्वारीचे नुकसान झाले. धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातील देऊळगाव व परिसरात वादळाने अनेक घरावरील पत्रे उडाले.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात पावसाने हजेरी लावली. राज्यात वातावरणात निम्न स्तरावरील द्रोणिका रेषा ही दक्षिण विदर्भ ते दक्षिण कर्नाटकापर्यंत विस्तारली असून ती मराठवाड्यातून जात आहे.
त्यामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर अन नांदेडमध्ये गुरुवार, १८ एप्रिल रोजी उष्णतेची लाट राहील. काही ठिकाणी जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने यलाे अलर्ट जारी केला आहे. आगामी दोन दिवस मध्य महाराष्ट्रात जिल्ह्यात रात्री उकाडा जाणवणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
विविध शहरातील तापमान : Marathwada weather । Summer News
बीड ४३.२, जळगाव ४२.८, सोलापूर ४२.४, परभणी ४१.७, नांदेड ४१.४,धाराशीव ४०.६, नाशिक ४०.६, छत्रपती संभाजीनगर ४०.५,जालना ४०.४