Live Cricket Score, PBKS vs MI Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 चा 33 वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 192 धावा केल्या. या सामन्यात सूर्यकुमार यादवने दमदार कामगिरी केली. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 23 वे अर्धशतक झळकावले. 360 डिग्री फलंदाजाने सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 78 धावा केल्या.
Innings Break!
A fluent 78* from Suryakumar Yadav and unbeaten 34* from Tilak Varma take #MI to 192/7 👌👌
Will it be enough for #PBKS? Find out 🔜
Scorecard ▶️ https://t.co/m7TQkWe8xz#TATAIPL | #PBKSvMI pic.twitter.com/a058p6oF5I
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2024
मुंबईला पहिला धक्का बसला तो केवळ आठ धावा करू शकलेल्या इशान किशनच्या रूपाने. रबाडाने त्याला आपला बळी बनवले. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सूर्याने रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने 25 चेंडूत 36 धावा केल्या. त्याच्या 250 व्या आयपीएल सामन्यात त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले.
यानंतर सूर्याने तिलक वर्मासोबत तिसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. त्याला सॅम करनने 148 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पंड्याला काही विशेष कामगिरी करता आली नाही. तो केवळ 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. याव्यतिरिक्त या सामन्यात टीम डेव्हिडने 14 धावा, रोमॅरियो शेफर्डने एक धाव आणि मोहम्मद नबी खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
तिलक वर्मा यानेही पंजाबविरुद्ध आक्रमक खेळी केली. त्याने 18 चेंडूचा सामना करताना 188.88 च्या स्ट्राइक रेटने 34 धावा केल्या. या नाबाद खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून दोन चौकार आणि दोन षटकार आले. हर्षल पटेलने शेवटच्या षटकात कहर केला. त्याने तीन विकेट घेतल्या. पंजाबसाठी त्याने या सामन्यात सर्वाधिक विकेट घेतल्या. सॅम करनने दोन तर कागिसो रबाडाला एक विकेट मिळाली.