Live Cricket Score, LSG vs GT Indian Premier League 2024 : आज, IPL 2024 च्या 21 व्या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यास 7.30 वाजता सुरूवात होणार आहे. लखनौ या सामन्यात विजयाची हॅट्ट्रिक करण्याचा प्रयत्न करेल, तर गेल्या सामन्यात पराभवाचा सामना करणाऱ्या गुजरातकडे पुनरागमनाचे लक्ष असेल.
आयपीएल सामन्यांच्या रेकॉर्डनुसार एकना स्टेडियमवर एकूण 8 सामने खेळले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 5 वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला केवळ तीन वेळा यश मिळाले आहे. या मैदानाच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांच्या खात्यात 56.7 टक्के विकेट्स आल्या आहेत. अशा स्थितीत वेगवान गोलंदाज एकानामध्ये वर्चस्व गाजवणार असल्याचे स्पष्ट होते.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा लखनौ सुपरजायंट्सच्या बाजूनं लागला आहे. लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी लखनौ संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
🚨 Toss Update 🚨
Lucknow Super Giants win the toss & elect to bat against Gujarat Titans in Match 21.
Follow the Match ▶️ https://t.co/P0VeELamEt#TATAIPL | #LSGvGT pic.twitter.com/0CYTWCi0NJ
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2024
या सामन्यासाठी गुजरातने संघात काही बदल केले आहेत. संघाचा यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा दुखापतीमुळे या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही. स्पेन्सर जॉन्सन संघात परतला आहे. ओमरझाईच्या जागी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे, तर बीआर शरत गुजरातकडून पदार्पण करणार आहे.
LSG vs GT Live : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), बीआर शरथ (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा.
इम्पॅक्ट सब : केन विल्यमसन, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड, मानव सुथार, जयंत यादव
𝐁𝐑 𝐒𝐡𝐚𝐫𝐚𝐭𝐡 and 𝐒𝐩𝐞𝐧𝐜𝐞𝐫 𝐉𝐨𝐡𝐧𝐬𝐨𝐧 march into our #LSGvGT XI 💪#AavaDe | #GTKarshe | #TATAIPL2024 #PaidPartnership @Dream11 pic.twitter.com/nkyYre4Otj
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 7, 2024
लखनौ सुपरजायंट्स : क्विंटन डी कॉक, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, यश ठाकूर, नवीन उल हक. मयंक यादव.
इम्पॅक्ट सब : मणिमारन सिद्धार्थ, दीपक हुडा, अमित मिश्रा, युधवीर सिंग चरक, अर्शद खान
IPL 2024 (RR vs RCB Match 19) : विराट कोहलीने एकाच सामन्यात नावावर केले 3 मोठे विक्रम…
दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये, लखनौ सुपर जायंट्सने त्यांच्या 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. यासह ते गुणतालिकेत 4 गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत. GT 4 गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही नवीन संघ आहेत आणि त्यांचा फक्त तिसरा आयपीएल हंगाम खेळत आहेत. आयपीएलमध्ये दोन्ही संघ चार वेळा आमनेसामने आले आहेत. गुजरात टायटन्सने हे चारही सामने जिंकले आहेत. एलएसजीला अद्याप जीटीसमोर विजयाचे खाते उघडता आलेले नाही.