IPL 2024 & Virat Kohli Records : आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीची बॅट बॅट आग ओकत आहे. या मोसमातील पहिले शतक विराटच्या बॅटमधून झळकले. त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 72 चेंडूत 113 धावांची खेळी खेळली, तरीही त्याच्या संघाचा 6 विकेट्सनी पराभव झाला. हा सामना आरसीबीने गमावला असला तरी विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. या मोसमात त्याने 5 सामन्यात 316 धावा केल्या आहेत. राजस्थानविरुद्ध 113 धावांची खेळी खेळून त्याने तीन मोठे विक्रम केले आणि इतिहास रचला आहे.
First record : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात एक मोठा विक्रम केला असून IPL इतिहासात त्याने 7500 हून अधिक धावा केल्या आहेत. 34 धावा करताच अशी कामगिरी करणारा कोहली जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने 7000 धावा केल्या नाहीत. पंजाब किंग्जचा (पीबीकेएस) सध्याचा कर्णधार शिखर धवन (6,683) या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 242 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 38.28 च्या सरासरीने आणि 130.63 च्या स्ट्राइक रेटने 7,579 धावा केल्या आहेत. चॅम्पियन्स लीग T20 मध्येही त्याने याच फ्रँचायझीसाठी 424 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे त्याने आरसीबी याच संघासाठी आतापर्यंत 8 हजार 003 धावा केल्या आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये एकाच (RCB) संघासाठी 8000 हून अधिक धावा करणारा तो आता जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
Second Record : विराट कोहलीने राजस्थानविरुद्ध आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला. कोहलीने 67 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि आयपीएलच्या चालू हंगामातील पहिले शतक झळकावले. या मोसमात शतक झळकावणारा कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. कोहलीचे आयपीएल कारकिर्दीतील हे आठवे शतक असून अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. या शतकासह कोहलीच्या नावावर मोठी कामगिरी नोंदवली गेली आहे. त्याच्या टी-20 क्रिकेट कारकिर्दीतील हे 9वे शतक ठरले आहे.
8 -विराट कोहली
6 – ख्रिस गेल
6 – जोस बटलर
4- केएल राहुल
4 – डेव्हिड वॉर्नर
4 – शेन वॉटसन
आयपीएलमधील विराट कोहलीची सर्व शतके
राजस्थान रॉयल्स – 113* धावा, IPL 2024
पंजाब किंग्ज – 113 धावा, IPL 2016
गुजरात लायन्स – 109 धावा, IPL 2016
रायझिंग पुणे सुपर जायंट्स – 108* धावा, IPL 2016
गुजरात टायटन्स – 101* धावा, IPL 2023
गुजरात लायन्स – 100* धावा, IPL 2016
कोलकाता नाईट रायडर्स – 100 धावा, IPL 2019
सनरायझर्स हैदराबाद – 100 धावा, IPL 2023
IPL 2024 : ऑस्ट्रेलियासाठी हिरो तर आरसीबीमध्ये झीरो! ‘हा’ खेळाडू बेंगळुरूसाठी ठरतोय ओझं?
Third Record : विराट कोहलीने आयपीएलमध्ये एक विक्रम मोडीत आपल्या नावावर केला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने सुरेश रैनाचा 109 झेल घेण्याचा विक्रम मोडला आहे. आता विराटच्या हातात 110 झेल आहेत. राजस्थानविरुद्धच्या डावाच्या 16व्या षटकात रियान परागचा झेल घेत कोहलीने ही खास कामगिरी केली.