IPL 2024, Live Cricket Score (DC vs SRH Match 35) : आज आयपीएल 2024 च्या 35व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात चांगली कामगिरी करून गुणतालिकेत आपले स्थान मजबूत करण्याकडे दिल्ली आणि हैदराबादचे लक्ष असेल. सामन्यास संध्याकाळी 7.30 वाजता सुरूवात होईल.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा ( Toss ) कौल हा दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बाजूनं लागला आहे. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( Delhi Capitals win the toss and elect to field against Sunrisers Hyderabad ) त्यामुळे टाॅस हरल्यानंतर आता हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.
🚨 Toss Update 🚨
Delhi Capitals win the toss and elect to field against Sunrisers Hyderabad.
Follow the Match ▶️ https://t.co/LZmP9Tevto#TATAIPL | #DCvSRH pic.twitter.com/IWtNBxr6Vj
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2024
दरम्यान, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2024 मध्ये 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 4 सामने गमावले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, सनरायझर्स हैदराबादने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत आणि 2 सामने गमावले आहेत. पॅट कमिन्सचा संघ 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
दरम्यान, आयपीएलमध्ये आतापर्यंत 23 सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले आहेत. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स (DC) ने 11 सामने जिंकले आहेत, तर सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने 12 सामन्यात विजयाची चव चाखली आहे. तसेच आयपीएलच्या इतिहासात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर एकूण 85 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 38 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि 46 दुसऱ्या सामन्यात फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.