IPL 2024, Chennai Superkings vs Lucknow Super Giants : आयपीएल 2024 च्या 39 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या मोसमात 7 पैकी 4-4 सामने जिंकून सीएसके चौथ्या आणि लखनौ पाचव्या स्थानावर आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीत आणखी पुढे जायचे आहे. अशा स्थितीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल.
CSK vs LSG : हेड टू हेड रेकॉर्ड…
चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील हेड टू हेड आकडेवारीबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 4 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये लखनौने 2 सामने जिंकले असून चेन्नईने एक सामना जिंकला आहे, तर एका सामन्याचा निकाल जाहीर होऊ शकला नाही. म्हणजेच बघितले तर लखनौचा संघ चेन्नईवर भारी पडत असल्याचे दिसते.
KL & Mahi, Then & Now 💙💛 pic.twitter.com/ODi2NqITcm
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 22, 2024
CSK vs LSG : खेळपट्टीचा अहवाल (Pitch report)
चेन्नईच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी गोलंदाजांसाठी, विशेषत: फिरकीपटूंसाठी खूप उपयुक्त आहे. होय, चेपॉकची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी स्वर्ग मानली जाते. चेन्नईच्या खेळपट्टीवर चेंडू वेगाने फिरतो, त्यामुळे फलंदाजांना त्यांचे शॉट्स सहज खेळणे आव्हानात्मक होते. जर आपण नाणेफेक बद्दल बोललो, तर कोणताही संघ नाणेफेक जिंकला तरी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे, कारण येथे लक्ष्याचा पाठलाग करणे काहीसे सोपे आहे.
IPL 2024 : दाम कमी पण काम मोठे..! अवघ्या 20 लाखांत ‘हे’ खेळाडू करतायेत करोडोंची कामगिरी…
गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर किंग्ज आज (मंगळवारी) चेपॉक स्टेडियमवर आमने-सामने असतील, तेव्हा मागील पराभवाचा बदला घेण्याचे आणि गुणतालिकेत आपले स्थान सुधारण्याचे चेन्नईचे लक्ष्य असेल. कारण, या मोसमातील (IPL 2024) शेवटच्या सामन्यात लखनौने चेन्नईचा 8 गडी राखून पराभव केला होता. हा सामना 19 एप्रिल रोजी लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळला गेला होता.