मुंबई – आयपीएल 2023 च्या हंगामातील आजचा सामना पंजाब किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स असा थोड्याच वेळात मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियमवर रंगणार आहे. मागील सामन्यात पंजाब किंग्जने मुंबईचा पराभव करत स्पर्धेत आघाडी घेतली आहे. तर लखनौला मागच्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं.
त्यामुळं आता केएल राहुलचा संघ आजचा सामना जिंकून आयपीएलच्या गुणतालिकेत झेप घेण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. तर पंजाब किंग्स आपल्या विजयाची घोडदौड सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
अशी असणार आहे टीम…
पंजाब किंग्ज – सॅम करन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, लियम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हरप्रीत भाटिया, शाहरुख खान, हरप्रीत बरार, कगिसो रबाडा आणि अर्शदीप सिंह
लखनऊ सुपर जायंट्स – के एल राहुल (कर्णधार), दीपक हुड्डा, क्रुणाल पांड्या, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बदोनी, अमित मिश्रा, जयदेव उनादकट, मार्क वुड, रवि बिश्नोई आणि आवेश खान