मुंबई – मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याला दुखापतीतून अद्याप सावरलेला नसल्याने त्याच्या संघाला पहिल्याच सामन्यात त्याच्याविना खेळावे लागणार आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत मुंबईला आता त्याचा पर्यायी खेळाडू म्हणून कोणाला खेळवायचे असा प्रश्न मुंबई इंडियन्ससमोर निर्माण झाला आहे.
सुर्यकुमारच्या हाताच्या अंगठ्याला फॅक्चर झाले असून यातून तो अद्याप सावरलेला नाही. वेस्ट इंडीज विरुद्धच्या टी-20 सामन्यात सुर्यकुमारला ही दुखापत झाली होती. त्यामुळेच त्याला श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेला मुकावे लागले होते.