पिंपरी – दोन वर्षाच्या लहान मुलीला सीएमई येथील लष्कराच्या हद्दीत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि. 14) दुपारी घडली. कुलेश्वर गजाधर ठाकुर (वय 25, सध्या रा. बोपखेल. मूळगाव झारखंड) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने सोमवारी (दि. 14) याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांच्या पीडित लहान मुलीस आरोपी ठाकुर याने सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास बिस्कीटाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्यावर गणेशनगर, बोपखेल आणि लष्कराच्या सीएमई मधील जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच हा प्रकार कोणाला सांगू नये म्हणून तिच्या गालावर मारहाण केली. महिला पोलीस उपनिरीक्षक विद्या माने याबाबत अधिक तपास करीत आहेत.