जगभरात पुन्हा एकदा करोना विषाणूचा धोका दिसून येत आहे. भारतात राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्याचा परिणाम आयपीएलवरही दिसून येत आहे. अलीकडेच दिल्ली कॅपिटल्स संघाच्या कॅम्पमध्ये करोनाचा एक रुग्ण आढळून आला. त्यानंतर आता आणखी एक खेळाडू करोना पॉझिटिव्ह मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा टेन्शन वाढले आहे.
अलीकडेच आयपीएल 2022 मध्ये करोना विषाणूची लागण झालेला एक रुग्ण आढळून आला होता. याआधी फिजियो पॅट्रिक फरहार्ट यांना कोरोनाची लागण झाली होती. आता टीममधील खेळाडू पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.
बायोबबल असूनही दिल्ली टीममधील एका खेळाडूची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे संपूर्ण टीमला हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. 20 एप्रिल रोजी दिल्लीची पुढची मॅच आहे. तोंडावर मॅच असताना खेळाडूला करोनाची लागण झाल्याने दिल्ली टीमचं टेन्शन वाढल्याचे दिसून आले आहे. दिल्लीची पुढची मॅच पुण्यात आहे. मात्र सर्व खेळाडूंना हॉटेलमध्येच क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्व खेळाडूंची करोना चाचणी होणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे.