नवी दिल्ली – अॅपलचा काही दिवसांपूर्वीच iPhone 15 हा मोबाईल लॉंच करण्यात आला. या नवीन आयफोनला ग्राहकांची मोठी पसंती मिळत असून लोक देखील हा फोन खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. मात्र आता iPhone 15 मध्ये हीटिंगच्या समस्या निर्माण होट असून याबाबत ग्राहक तक्रार करू लागले आहेत. Apple iPhone 15 वापरल्यानंतर काही काळाने आयफोन ओव्हर हिट होत असल्याचे युजर्स सांगत आहेत.
iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max हे फोन चार्जिंग करताना खूपच गरम होत आहेत. त्यामुळे आयफोन हातातही घेणे देखील ते शक्य होत नसल्याची तक्रार यूजर्सनी केली आहे. एवढंच नाही, तर गेमिंग आणि फोन कॉल करतानाही हे फोन गरम होत असल्याचं यूजर्सचं म्हणणं आहे. आता यावर कंपनीकडूनही भाष्य करण्यात आले आहे.
कंपनी या समस्येचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच, क्यूपर्टिनो, यूएस-आधारित कंपनीनं iOS 17 मधील बगमुळे हे झाल्याचे कंपनीने म्हटलं आहे. काही अॅप आहेत, त्यामुळेही ओव्हरहिटिंग होत असल्याचं अॅपलचं म्हणणं आहे. परंतु, सॉफ्टवेअर अपडेटद्वारे ही समस्या दूर होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.
आयफोन ओव्हरहिट होण्याची पुढील कारणे आली समोर
डिव्हाइस सेटअप केल्यानंतर किंवा पुन्हा रिस्टार्ट केल्यानंतर पहिल्या काही दिवसांमध्ये डिव्हाइस गरम होऊ शकतो, असं अॅपलचं म्हणणं आहे. टायटॅनियम बॉडीमुळे आणि सी-टाईप चार्जिंग पोर्टमुळे आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये हीटिंग समस्या होत असल्याची चर्चा अॅपलने फेटाळून लावली आहे.