बीड – राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) बीडमधील आमदार (beed Mla) प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांच्या घराची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली होती. या घटनेत प्रकाश सोळंके यांच्या घरासह तीन वाहने जाळण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली असून एकास अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सदर घटनेच्या तीन दिवसांनंतर काल (2 नोव्हेंबर) आमदार प्रकाश सोळंके (Mla Solanke) यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली होती. आंदोलकांच्या ज्या जमावाने माझ्या घरावर हल्ला केला, त्यांचा हेतू मला जीवे मारण्याचा होता. पण त्यावेळी मराठ्यांनीच मला वाचवले असा दावा प्रकाश सोळंके यांनी केला आहे.
ज्या फोननंतर सोळंके यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. त्या फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. सुंदर भोसले असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो धारूर तालुक्यातील धूनकवड येथील रहिवासी आहे. काल रात्री उशिरा भोसलेला माजलगाव पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतले आहे.(ncp)
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रकाश सोळंके यांची एक कथीत ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. यात त्यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला होता. याच अनुषंगाने मराठा समाजबांधव आक्रमक झाले आणि त्यांनी सोळंके यांच्या घरावर मोर्चा काढून दगडफेक आणि जाळपोळ केल्याचे म्हंटले जात आहे.