पुणे – ग्राहकांच्या गरजा बदलत असून सामाजिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या सक्रिय ग्राहकांची पिढी उदयास येत आहे. असे ग्राहक मूल्य आणि पर्यावरण जपणाऱ्या ब्रँड्स व उत्पादनांशी अधिकाधिक जोडले जात आहेत. या नवीन पिढीच्या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेता ‘डी बिअर्स’ने ‘कोड ऑफ ओरिजीन’ हा विश्वसनीय हिऱ्यांसंबंधी उपक्रम १८९ वर्षांची परंपरा असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या महाराष्ट्र आणि गोव्यामधील दालनांमध्ये सादर केला आहे.
‘डी बिअर्स कोड ऑफ ओरिजीन’ हा एक विश्वासार्ह स्त्रोत उपक्रम असून ‘डी बिअर्स’ची सामाजिक आणि पर्यावरणीय सखोल बांधिलकी दर्शवितो. त्यामुळे ग्राहक हिरे कुठून येतात याबाबत अभिमान बाळगू शकतात. ‘डी बिअर्स कोड ऑफ ओरिजीन’ म्हणजे हिरे हे नैसर्गिक आणि संघर्षमुक्त असण्याचा पुरावा आहे आणि हे ‘डी बिअर्स’ने बोटसवाना, कॅनडा, नामिबिया व दक्षिण आफ्रिका येथे शोधले असून यामुळे तेथील लोकांना नोकऱ्या, शिक्षण आणि आरोग्यसेवेत तसेच तेथील वन्यजीव संवर्धनात मदत झाली आहे.
या उपक्रमांतर्गत हिऱ्याचा प्रत्येक दागिना हा ‘डीबीएम’ या कोरल्या गेलेल्या अक्षरांसह १२ डिजिट कोडसह येतो. हा कोड प्रत्येक दागिन्याबरोबर येणाऱ्या ‘डी बिअर्स कोड ऑफ ओरिजीन’ कार्डवर देखील पाहायला मिळतो. ग्राहकांना त्यांनी घेतलेल्या दागिन्यांमधील हिरे हे १०० टक्के नैसर्गिक, शोधण्यायोग्य आणि शाश्वत स्त्रोताकडून प्राप्त झाल्याची हमी मिळते.
याबाबत बोलताना ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, पीएनजी ज्वेलर्स हा ब्रँड गेल्या दोन शतकांपासून विश्वास, बांधिलकी आणि शुद्धता या मूल्यांसाठी कटिबद्ध राहिला आहे. आमच्या या मूल्यांना अधिक बळ देण्यासाठी आणि ग्राहकांना लाभ देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. डी बिअर्स समूहाबरोबर आमचा हा सहयोग अत्यंत मौल्यवान असून महाराष्ट्र आणि गोव्यामधील आमच्या १५ दालनांमध्ये ‘कोड ऑफ ओरिजीन’ उपक्रम सुरू होणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. नैतिक आणि शाश्वत पद्धतींच्या हमीसह ०.०८ कॅरेट आणि त्याखालील नैसर्गिक हिऱ्यांचे दागिने म्हणजे ग्राहकांना अतिरिक्त लाभ आहे. ‘डी बिअर्स’ या ब्रँडबरोबर आमचा सहयोग हा दीर्घकालीन असेल, याची आम्हाला खात्री आहे.
‘डी बिअर्स इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक सचिन जैन म्हणाले की, भारतीय ग्राहकांसाठी ‘डी बिअर्स कोड ऑफ ओरिजीन’ ही संकल्पना म्हणजे आमच्या विश्वासार्ह रिटेल भागीदारांद्वारे ग्राहकांना मिळालेल्या त्यांच्या पसंतीच्या हिऱ्यांच्या दागिन्यांच्या स्त्रोताविषयी आणि प्रवासाबद्दल संपूर्ण पारदर्शकता प्रदान करणे हे आहे. ‘डी बिअर्स कोड ऑफ ओरिजीन’च्या हमीमुळे हिरे परिधान करताना प्रसन्न व समाधानकारक वाटेल. हे नैसर्गिक आणि सुंदर हिरे जगभरातील तरुण मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणाऱ्या, नैतिक मूल्य जपणाऱ्या आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तत्पर असलेल्या, कंपनीकडून तयार केले गेले आहेत. ‘डी बिअर्स कोड ऑफ ओरिजीन’ कोरले असलेले हे दागिने खरेदी करून ग्राहक स्वत: २०३० बिल्डिंग फॉरएव्हर मिशनमध्ये योगदान देत आहेत, जेणेकरून हे जग अधिक चांगले बनू शकेल.
‘डी बिअर्स कोड ऑफ ओरिजीन’ उद्योगातील अग्रगण्य नैतिक पद्धतींवर आधारित १२ शाश्वत ध्येयांद्वारे चांगल्या भविष्यासाठी ब्रँडच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाचा एक भाग आहे. याअंतर्गत निसर्गाचे संवर्धन, समुदायांच्या संपन्नतेसाठी भागीदारी आणि सर्वांना समान संधी हादेखील भाग आहे.