पिंपरी, दि. 4 – पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील सहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सोमवारी ( दि. 3) रात्री उशिरा आदेश काढले आहेत.
त्यानुसार दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे व देहूरोडच्या पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांची वाहतूक शाखेत, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांची चिखली पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. याशिवाय गुन्हे शाळा युनिट चारचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत यांची दिघी पोलीस ठाण्यात, चिखलीचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांची महाळुंगे पोलीस ठाण्यात, महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांची देहूरोड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच साबळे यांची आळंदी पोलीस स्टेशनहून महाळुंगे पोलीस स्टेशन येथे बदली झाली होती.