जम्मू- जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांमध्ये ताबारेषेजवळच्या गावांमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून आज गोळीबार आणि मोर्टारचा मारा करण्यात आला. या गोळीबरामध्ये एक 25 वर्षीय हमाल जखमी झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मोहम्मद महरूफ असे या हमालाचे नाव असून तो चल्लस गावचा रहिवासी आहे. राजौरी जिल्ह्यतल्या केरी भागात त्याच्या शेजारीज स्फोट झालेल्या मोर्टारच्या तुकड्यांमुळे तो जखमी झाला. त्याला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले आणि प्राथमिक उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले.
राजौरी जिल्ह्यात केरी भागात आणि पूंछ जिल्ह्यात कृष्णा घाटी परिसरामध्ये पाकिस्तानी सैन्याकडून आज जोरदार गोळीबार झाला. त्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून त्वरित आणि चोख प्रत्युत्त्र दिले गेले, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या 15 दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याकडून होणारा हा गोळीबार थंडावला होता. मात्र गुरुवारपासून या गोळीबाराला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. पूंछमधील शाहपूर आणि किमी या भागांमध्ये आणि कासबा भागात् शुक्रवरी पाकिस्तानी गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.