सपना चौधरीचा डान्स शो पोलिसांनी बंद केला

सपना चौधरी भोजपुरी, हरियाणवी, पंजाबी अशा सर्व सिनेमांमध्ये, रिऍलिटी शो मध्ये सहभागी होते. तिच्या डान्सचे हजारो चाहते आहेत. पण मध्यंतरी एका कार्यक्रमामध्ये सपनाचा डान्स परफॉर्मन्स सुरू असताना अचानक पोलिस स्टेजवर आले आणि त्यांनी चक्क सपनाचा डान्स बंद करायला भाग पाडले. त्यांनी आयोजकांना बरेच झापले, असा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.

याची अधिक माहिती घेतल्यावर असे समजले की इव्हेंटच्या आयोजकांनी सपनाच्या डान्स परफॉर्मन्सबाबत पोलिसांकडून परवानगी घेतलेली नव्हती. तसे तर कोणत्याही प्रगट कार्यक्रमासाठी पोलिसांकडून परवानगी घ्यायला लागते. त्यात सपना एक सेलिब्रिटी असल्याने तिच्या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होऊन काही गोंधळ होण्याची शक्‍यता नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे पोलिसांनी कार्यक्रमच रद्द करून टाकला.

“बिग बॉस’मध्ये सहभागी झाल्यापासून सपनाने आपल्या मानधनात भरपूर वाढ केली आहे. ती एका कार्यक्रमासाठी 3-4 लाख रुपये मानधन घेते, असे ऐकिवात आहे. मात्र अशा सेलिब्रिटीच्या कार्यक्रमाची परवानगी घेतली जाऊ नये. त्यामुळे पोलिसांनी थेट स्टेजवर येऊन हस्तक्षेप करत कार्यक्रमच बंद करावा म्हणजे जरा…

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.