#INDvWI : विंडीजचे भारतासमोर २०८ धावांचे आव्हान

हैदराबाद : शिमरन हेटमायरच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर विंडीजने भारतीय संघाच्या समोर विजयासाठी २०८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने २० षटकांत ५ बाद २०७ धावा केल्या आहेत.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्विकारून विंडीजला प्रथम फलंदाजीस पाचारण केले होते. विंडीजची सुरूवात खराब झाली. सलामीवीर लेंडन सिमन्सला दीपक चहरने रोहित शर्माकरवी झेलबाद करत विंडीजला पहिला धक्का दिला. सिमन्स ०२ धावांवर बाद झाला. त्यानंतर एविन लुईसने १७ चेंडूतस४०, ब्रँडन किंगने २३ चेडूंत ३१, शिमरन हेटमायरने ४१ चेंडूत ५६, कायरन पोलार्डने १९ चेंडूत ३७ आणि जेसन होल्डरने ९ चेंडूत २४ धावा करत संघाची धावसंख्या २०७ पर्यत नेली.

भारतीय संघाचे आज गच्छाळ क्षेत्ररक्षण झाले. भारताच्या विराटने आणि रोहितने प्रत्येकी १ झेल सोडला तर सुंदरने २ झेल सोडले. भारताकडून चहल याने ४ षटकात ३६ धावा देत २ गडी बाद केले. दीपक चहरने ४ षटकात सर्वाधिक ५६ धावा देत १ गडी बाद केला. फिरकीपटू सुंदरने ३ षटकात ३४ धावा देत १ गडी तर जडेजाने ४ षटकात ३० धावा देत १ गडी बाद केला. शिवम दूबेनी १ षटकात १३ धावा दिल्या, त्याला गडी बाद करण्यात अपयश आले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)