मुंबई : सलामीवीर डेव्हिड वाॅर्नर आणि कर्णधार अॅरन फिंचच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने भारतावर १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. यासह आॅस्ट्रेलियाने तीन सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
That's that from the Wankhede.
Absolute domination by the Australian openers as Australia win the 1st ODI by 10 wickets and go 1-0 up in the three-match series.
Scorecard – https://t.co/yur0YuDrGa #INDvAUS pic.twitter.com/VF05mP0kg7
— BCCI (@BCCI) January 14, 2020
विजयासाठीचे २५६ धावांचे आव्हान आॅस्ट्रेलियाने ३७.४ षटकांत बिनबाद २५८ धावा करत सहज पूर्ण केले. आॅस्ट्रेलियाकडून सलामीवीर डेव्हिड वाॅर्नरने ११२ चेडूंत १७ चौकार व ३ षटकांरासह १२८ तर अॅरन फिंचने ११४ चेंडूत १३ चौकार व २ षटकारांसह ११० धावांची खेळी करत आॅस्ट्रेलियाला भारतावर एकतर्फी विजय मिळवून दिला. अॅरन फिंचने कारकिर्दीतील १६ वे तर डेव्हिड वाॅर्नरने १८ वे शतक झळकावले. दोघांनी २५८ धावांची भागिदारी केली, ही भारताविरूध्दची सर्वोच्च व विक्रमी भागिदारी ठरली. एकाही भारतीय गोलंदाजांला अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि भारताला मोठा पराभव पत्कारावा लागला.
That's it! Australia have recorded their biggest win over India EVER! Incredible performance
SCORES: https://t.co/J8WD0geFkm #INDvAUS pic.twitter.com/Poqrimp4DW
— cricket.com.au (@cricketcomau) January 14, 2020
तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरन फिंच याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केले होते. भारतीय संघाची सुरूवात चांगली झाली नाही. संघाची धावसंख्या १३ असताना स्टार्कने डेविड वाॅर्नरकरवी रोहित शर्माला १० धावांवर झेलबाद केले. त्यानंतर लोकेश राहूल आणि शिखर धवन याने डाव दुस-या विकेटसाठी १२१ धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या १३४ पर्यंत नेली. राहुल ४७ धावांवर बाद झाला. त्यानंतर पुढच्याच षटकांत शिखर धवनला पैट कमिन्सने एगरकरवी झेलबाद करत भारतीय संघास १४० धावसंख्येवर तिसरा धक्का दिला. धवनने ९१ चेंडूत ९ चौकार व १ षटकारासह सर्वाधिक ७४ धावांची खेळी केली.
त्यानंतर फलंदाजीस आलेला संघाचा कर्णधार विराट कोहली मोठी खेळी करेल अस वाटलं होतं, पण एडम जम्पाने त्याला १६ धावांवर बाद करत माघारी धाडलं. नवोदित युवा खेळाडू श्रेयस अय्यर ही अवघ्या ४ धावांवर बाद झाला, त्यावेळी भारताची ३२.५ षटकांत ५ बाद १६४ अशी स्थिती झाली होती.
त्यानंतर शेवटचे पाच फलंदाज अवघ्या ९१ धावांवर माघारी परतले. यामध्ये रिषभ पंत २८, रविंद्र जडेजा २५, शार्दुल ठाकूर १३, मोहम्मद शमी १०, कुलदीप यादव १७ धावांवर बाद झाले आणि भारताचा डाव ४९.१ षटकांत सर्वबाद २५५ वर संपुष्टात आला.
Innings Break!
After being put to bat first, #TeamIndia are all out for 255 in 49.1 overs.
Will it be enough on this Wankhede wicket? #INDvAUS pic.twitter.com/Wg9SZfDaXN
— BCCI (@BCCI) January 14, 2020
आॅस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मिचेल स्टार्कने १० षटकात ५६ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. पैट कमिन्स आणि केन रिचर्डसनने प्रत्येकी २ तर एडम जम्पा आणि एश्टन एगरने प्रत्येकी १ गडी बाद केला.