द्वारकापुरी – इंदूरच्या द्वारकापुरी भागात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका कंत्राटदाराने आधी आपल्या पत्नीचा मोबाईल चार्जरच्या केबलने गळा आवळून खून केला आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे पतीने हे कृत्य केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता, यावरून दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू होता. मुले घराबाहेर पडताच ठेकेदाराने हे पाऊल उचलले. त्याचवेळी पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. ज्यामध्ये ‘मी माझ्या पत्नीची हत्या करून आत्महत्या करत आहे’, असे लिहिले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
रंजीत असे पतीचे नाव असून संतोषी पत्नीचे नाव आहे. रंजीतने पत्नी संतोषीची मोबाईल चार्जरच्या केबलने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत: आत्महत्या केली. यावेळी 14 वर्षीय सौरभ व 10 वर्षीय निधी हे दोन्ही मुले घराबाहेर होते. पुढील तपास पोलिस करत आहेत.