मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय टॅलेंट हंट शो म्हणजेच, “इंडियाज गॉट टॅलेंड- सिझन 9’नं यंदा प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. नुकतंच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला असून, ग्रँड फिनालेमध्ये बॉलिवूडसह अनेक अन्य सिलेब्रिटी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपासून हा कार्यक्रम चालू होता.
दरम्यान, यंदाच्या ‘इंडियाज गॉट टॅलेंड- सिझन 9’चं विजेतेपद ‘दिव्यांश आणि मनुराज’ या जोडीने पटकावलं आहे. बीटबॉक्सिंग आणि बासरीवादन करत या दोघांनी प्रेक्षकांची आणि परीक्षकांची मनं जिंकली.
View this post on Instagram
विशेष म्हणजे दिव्यांश आणि मनुराज हे ऑडिशनसाठी दुसऱ्या पार्टनरसोबत आले होते. मात्र शोदरम्यान या दोघांची जोडी जमली. आणि हीच जोडी आज संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली आहे.
View this post on Instagram
‘इंडियाज गॉट टॅलेंड 9’चं सूत्रसंचालन अर्जुन बिजलानी करत होता. तर किरण खेर, शिल्पा शेट्टी, बादशाह आणि मनोज मुंतशीर या शोचे परीक्षक होते. दरम्यान, रविवारी पार पडलेल्या या सोहळ्यासाठी ‘हिरोपंती 2’चे कलाकार टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी हजेरी लावली होती.