न्यूयॉर्क : भारताची महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक चांद्रयान-३ या मोहिमेचा आज शेवटचा टप्पा पार पडणार आहे. चांद्रयान आज चंद्रावर लँड होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेविषयी जेवढी भारतात उत्सुकता आहे तेवढीच उत्कंठा संपूर्ण जगाला लागली आहे. त्यामुळेच अमेरिकेची अंतराळ संसोधन संस्था नासाने देखील हा सोहळा लाईव्ह दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नासा टीव्हीवरुन या लॅण्डिंगचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
भारताच्या या महत्वाकांक्षी योजनेला रशियाने देखील शुभेच्छा दिल्या आहेत. रशियाने आपल्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये,”आम्ही उद्याची आतुरतेनं वाट पाहत आहोत. उद्या याला मोठे यश मिळेल अशी आम्हाला आशा आहे,” असे म्हटले आहे.
Big Breaking News – NASA TV will also telecast soft landing of Chandrayaan-3 tomorrow.
Russia too wishes India a great success. Russia said it is eagerly waiting for tomorrow’s event in the lunar orbit and it will definitely be a great success 💙.
India will be first country…
— Times Algebra (@TimesAlgebraIND) August 22, 2023
दरम्यान, चंद्रावर आत्तापर्यंत अमेरिका, रशिया, चीन यांच्यासह भारताने स्वारी केली आहे. पण दक्षिण ध्रुवावर यांपैकी अद्याप एकही देश पोहचू शकलेले नाही.
नुकतीच रशियाच्या लुना २५ चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे झेपावले होते, पण त्यांच चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होऊ शकले नाही ते कोसळले. त्यामुळे आता भारताच्या विक्रम लँडरकडे सर्वांच्या नजरा आहेत. जर लँडर यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले तर अशी कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरणार आहे.