मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रियालिटी शो ‘इंडियन आयडॉल मराठी’च्या पहिल्या सीजनचा विजेता काल निश्चित करण्यात आला. ‘इंडियन आयडॉल मराठी’च्या पहिल्या सिझनच्या ट्रॉफीवर ‘सागर म्हात्रे’ने आपलं नाव कोरलं. या यशामुळे सागर म्हात्रेचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.
अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा’ म्हणत हा मराठी इंडियन आयडॉल हा शो मराठी प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरला होता. या शो मध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. दरम्यान, अखेर काल पनवेलच्या सागर म्हात्रे या तरुणाने या ‘इंडियन आयडॉल मराठी’च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
‘इंडियन आयडल मराठी’च्या पहिल्या सीजनचा विजेता आहे सागर म्हात्रे!#इंडियनआयडलमराठी | #IndianIdolMarathi#सोनीमराठी | #SonyMarathi#विणूयाअतूटनाती | #vinuyaatutnati pic.twitter.com/RlaEDHUDYq
— Sony मराठी (@sonymarathitv) April 20, 2022
पेशाने इंजिनियर असणारा हा तरुण त्याच्या गोड गळ्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतो आहे. गेल्या आठवड्यात त्याच्या सादरीकरणाला परीक्षकांकडून झिंगाट परफॉर्मन्स मिळाला. आणि आज तो संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज बनला आहे.