नवी दिल्ली – देशात एका दिवसात कोविड-19 चे 2 हजार 380 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. या नवीन रुग्णांबरोबर करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 4, कोटी 30 लाख 49 हजार 974 वर पोहोचली आहे. कालच्या तुलनेत आज 313 रुग्ण अधिक मिळाली आहेत. देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील 13 हजार 433 वर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, भारतात करोना संसर्गामुळे आणखी 56 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर, मृतांची संख्या 5 लाख 22 हजार 062 झाली आहे. देशात कोविड-19 च्या सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 433 वर पोहोचली आहे, जी एकूण प्रकरणांच्या 0.03 टक्के आहे. आकजेवारीनुसार गेल्या 24 तासांत 1 हजार 093 सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 1 हजार 231 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.