भारतातील ई-मोबिलिटी वेग घेत आहे – आणि इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात अधिक वेगाने पुढे जात आहे. हेच लक्षात घेऊन फ्युचरएक्स ग्रुप ने ‘इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शो 2022’ चे आयोजन ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड, पुणे येथे केलॆ होते. या शो मध्ये सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी ऑटोमोटिव्ह उद्योग, इलेक्ट्रि्फिकेशन फॅसिलिटेटर आणि इतर विविध ईव्ही औद्योगिक क्षेत्रातील 120 हून अधिक देशभरातील कंपन्यांचा समावेश होता.
इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शोच्या पहिल्या प्रदर्शनाला भरगोस प्रतिसाद मिळाला १२,००० हून अधिक व्हिसिटर्सनी आणि १३० हून अधिक डेलिगेट्सनी या EV प्रदर्शन आणि परिषदेत भाग घेतला. या तीन दिवसाच्या परिषदेत सरकार, व्यवसाय आणि संशोधन संस्था यांच्या सहकार्यातुन EV क्षेत्रात कशी मदत होऊ शकते या वर चर्चा झाली, ज्यामध्ये उत्सर्जन कमी करणे , पुरवठा साखळीतील विविधता व सुरक्षितता वाढवणे, आणि खर्च कमी करणारी शाश्वत वाहतूक व्यवस्था वितरीत कशी करता येईल अशा अनेक विषयांवर येथे चर्चा झाली.
या वेळी फ्युचरेक्स ग्रुपचे संचालक नमित गुप्ता म्हणाले की “इंडिया इंटरनॅशनल ईव्ही शोने या उद्योगातील सर्वात प्रभावशाली विचारांना एकत्र आण्याचे काम केले आहे. ज्यामध्ये भारतातील ईव्ही क्षेत्रातील विकासाचे त्यांचे विचार आणि यश सर्वांसमोर मांडले गेले. त्याच प्रमाणे ईव्ही क्षेत्रातील भविष्यासाठी संधी आणि कमी प्रदूषणकारी वाहतुकीच्या संक्रमणास गती देण्यासाठी कशी मदत करू शकते. यावर देखील परिषदेत चर्चा झाली.” पुढे ते म्हणाले की “इलेक्ट्रिक वाहनांच्या या झपाट्याने वाढीचा विचार केल्यास, भारत नक्कीच इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये जगाचे नेतृत्व करेल.”
ऑटोमोबाईल क्षेत्राचे विद्युतीकरण संपूर्ण पुरवठा साखळीत बदल आणेल आणि परिणामी ऑटोमोटिव्ह घटकांच्या बाजाराचा आकार मोठ्या प्रमाणात वाढवेल. 2030 पर्यंत, विद्युतीकरणाचे प्रमुख घटक, जसे की बॅटरी आणि इलेक्ट्रिक ड्राइव्ह, स्वायत्त ड्रायव्हिंग, लाईट डिटेक्शन आणि रेंजिंग (LiDR), सेन्सर्स आणि रडार सेन्सर्स, एकूण बाजाराच्या आकाराच्या अंदाजे 52% भाग असतील.
हे प्रदर्शन EV क्षेत्रातील सर्वसमावेशक बाजार माहिती, व्यवसायाच्या संधी आणि व्यवसायिकांमधील नेटवर्किंगसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरले. यामध्ये ईव्ही क्षेत्रातील उत्पादक, तंत्रज्ञान विकासक, बॅटरी उत्पादक, चार्जिंगच्या पायाभूत सुविधा, घटक उत्पादक, वितरण भागीदार करणाऱ्या देशभरातील विविध कंपन्यांचा या प्रदर्शनात समावेश होता. त्याच बरोबर EV क्षेत्रातील धोरण निर्माते जसे की सरकार आणि मंत्रालये, खाजगी संस्था, उद्योग संघटना इत्यादींचा ही येथे समावेश दिसून आला.