अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा आळवला काश्मीरी राग
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीर प्रकरणात भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा राग आळवला आहे. काश्मीर प्रश्नावर आपण भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी चर्चा केल्याचे सांगत ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी हा प्रश्न चर्चेने सोडवावा असेही म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जनरल असेंब्लीला संबोधित करताना ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि भारताच्या नेत्यांशी द्विपक्षीय व्यापार निर्माण करण्याबाबत अतिशय फलदायी चर्चा केली असल्याचे म्हटले.
US President Donald Trump: With respect to Pakistan and India, we talked about Kashmir. I offered whether it is arbitration or mediation, or whatever it has to be I’ll do whatever I can because they are at very serious odds right now and hopefully that will get better. pic.twitter.com/0JsT9PkOoF
— ANI (@ANI) September 25, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींमध्ये दोनवेळा भेट झाली. दरम्यान, या भेटीवेळी ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. तर भारताकडून त्यांच्या या प्रस्तावावर काश्मीरचा मुद्दा हा द्वीपक्षीय असून इतर कोणत्याही देशाला यात ढवळाढवळ करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्राच्या असेंब्लिला संबोधित करताना ट्रम्प यांनी काश्मीरच्या मुद्यावर आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.