कोरोना बाबत भारत आणि इस्त्रायल जगाला देऊ शकतात ‘गुड न्युज’

यरूशलेम: इस्त्रायलने बुधवारी आशा व्यक्त केली की दोन देशांच्या संयुक्त प्रयत्नांनी काही महिन्यांत जगाला “चांगली बातमी” दिली जाईल. इजराइल आणि भारतातील शास्त्रज्ञ वेगवान कोरोना तपासणी प्रणाली विकसित करण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्पात काम करत आहेत. या वेगवान तपासणीमुळे काही सेकंदात निकाल मिळेल.

इस्त्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, संरक्षण संशोधन संचालनालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने इस्त्रायलच्या चार क्लिनिकल तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी आणि त्यांची पुष्टी करण्यासाठी नमुने गोळा करण्याचे कार्य पूर्ण केले आहे.

इस्त्रायल दूतावासातील संरक्षण संबंधित अधिकारी कर्नल असाफ मलर यांच्या हवाल्याने निवेदनात म्हटले आहे की, जगाला वेगवान कोरोनाची चाचणी घेण्याची तांत्रिक क्षमता प्रदान करणे आणि काही सेकंदातच निकाल मिळविणे हे आपले लक्ष्य आहे. यामुळे विमानतळ, कार्यालये, शाळा, रेल्वे स्थानके इत्यादी सुरू करता येतील.

मलर म्हणाले, “या प्रकल्पासाठी भारताचे सहकार्य अद्भुत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैज्ञानिक सल्लागार यांच्यासह सर्व संशोधन व विकास संस्था पूर्ण क्षमतेने या प्रकल्पात सामील झाल्या आहेत. आम्हाला आशा आहे की काही महिन्यांत आम्ही  जगाला चांगली बातमी देण्यात सक्षम होऊ” इस्त्रायलची टीम 26 जुलै रोजी भारतात रवाना झाली असून काही दिवसात परत येईल आणि कोविड -19 च्या रूग्णांचे 20,000 हून अधिक नमुने मिळतील.

Leave A Reply

Your email address will not be published.