IND vs AFG T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 11 जानेवारीपासून T20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने खेळवले जाणार आहेत. मालिका सुरू होण्याच्या पाच दिवस आधी अफगाणिस्तान टीमने आपला संघ जाहीर केला आहे. मात्र, टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. अफगाणिस्तानचा संघ प्रथमच टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येत आहे. यावर्षी खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाचा विचार करता ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यामुळेच अफगाणिस्तान संघाने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी 19 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
या खेळाडूला कर्णधारपद मिळाले
अफगाणिस्तानचा नियमित T20 कर्णधार रशीद खानचा भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र मालिकेत तो खेळू शकण्याची शक्यता कमी आहे. नुकत्याच झालेल्या पाठीच्या शस्त्रक्रियेतून तो बरा झाला आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे. बोर्डाने पुढे सांगितले की, शारजाह येथे यूएई विरुद्ध 2-1 ने मालिका जिंकून अफगाणिस्तानचे नेतृत्व करणारा इब्राहिम झद्रान भारताविरुद्धही अफगाणिस्तानचे नेतृत्व करत राहील. या सर्वांशिवाय मुजीब उर रहमानचे पुन्हा एकदा संघात पुनरागमन झाले आहे. अलीकडेच UAE विरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली नव्हती.
काय म्हणाले ACB चेअरमन?
या मालिकेसाठी संघाच्या घोषणेवर एसीबीचे अध्यक्ष मिरवाईस अश्रफ म्हणाले की, तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या पहिल्या दौऱ्यावर आल्याने आम्हाला आनंद होत आहे. भारत हा जगातील अव्वल क्रमांकाचा संघ आहे आणि अफगाणिस्तानला तीन सामन्यांच्या T20 मालिकेत त्यांच्याविरुद्ध स्पर्धा करताना पाहणे खूप आनंददायी आहे. आमचा असा विश्वास आहे की अफगाणिस्तान आता कमकुवत नाही आणि अलीकडच्या काळात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे आणि आम्ही भारताविरुद्ध चांगल्या मालिकेची वाट पाहत आहोत.
🚨 𝐒𝐐𝐔𝐀𝐃 𝐀𝐋𝐄𝐑𝐓! 🚨
AfghanAtalan Lineup revealed for the three-match T20I series against @BCCI. 🤩
More 👉: https://t.co/hMGh4OY0Pf | #AfghanAtalan | #INDvAFG pic.twitter.com/DqBGmpcIh4
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) January 6, 2024
असा असेल अफगाणिस्तानचा संघ
इब्राहिम झदरन (कर्णधार), रेहमानुल्ला गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला जद्रान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद. नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशिद खान.