सोरतापवाडी -पुणे – सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाका ते ऊरुळी कांचनपर्यंत पेट्रोल पंपासमोरील बेशिस्तपणे उभ्या असलेल्या अवजड वाहनांचे पार्किंग बंद करण्याची मागणी पूर्व हवेलीतील नागरिकांमधून होत आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी व उरुळी कांचन हद्दीमध्ये अनेक कंपन्यांचे डिझेल, पेट्रोल व सीएनजी पंप आहेत. या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने इंधन भरून बाहेर पडताना महामार्गावरील वाहने न
दिसल्याने अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत.पेट्रोलपंपाच्या समोर अवजड वाहने लावल्याने या अपघाताला ही वाहने कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे येथील पेट्रोल पंपासमोरील बेशिस्त पार्कींग वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.