नवी दिल्ली – देशातील कोळशाचे उत्पादन ऑक्टोबरमध्ये 18.59 टक्क्यांनी वाढून 78.65 दशलक्ष टन इतके झाले आहे.
मागील आर्थिक वर्षात याच महिन्यात देशात 66.32 मेट्रिक टन इतके कोळसा उत्पादन झाले होते.
सरकारी मालकीच्या कोल इंडिया लिमीटेडचे कोळसा उत्पादन या वर्षी ऑक्टोबरमध्ये 15.36 टक्क्यांनी वाढून 61.07 मेट्रिक टन झाले आहे, जे मागील वर्षी 52.94 मेट्रिक टन इतके होते असे कोळसा मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
देशांतर्गत कोळसा उत्पादनात कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) चा वाटा 80 टक्क्यांहून अधिक आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, कोळसा उत्पादन आणि त्याच्या पुरवठ्यात झालेली वाढ देशाच्या प्रगतीशील ऊर्जेची स्वयंपूर्णता अधोरेखित करते.
त्यातून देशातील संभाव्य ऊर्जा मागण्या पूर्ण करण्याच्या आमच्या निर्धाराला बळ देते, असे मंत्रालयाने म्हटले आहे.देशात मागणीनुसार कोळसा पुरवठा करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असेही कोळसा मंत्रालयाने म्हटले आहे.