मुंबई – एटीएमचा वापर करत असणऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. एटीएमचा मोफत वापराच्या मर्यादेपेक्षा अधिक वापर केल्यास आता जास्तीचे शुक्ल आकारण्यात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकने एटीएमच्या मोफत वापरानंतर व्यवहार केल्यास कस्टमर चार्ज आणि एटीएम चार्जस वाढवले असून प्रति ट्रांझॅक्शन 20 पासून 21 रुपये केले आहेत.
ही वाढ 1 ऑगस्ट, 2021 पासून लागू होणार असल्याचे आरबीआय कडून माहिती देताना सांगण्यात आले आहे. त्यामुळे बँकेशिवाय अन्य बँकेतून पैसे काढतात तेव्हा मोफत वापराच्या मर्यादेपेक्षा अधिक वापर केल्यास जास्त पैसे कापले जाऊ शकतात.
भारतीय रिझर्व्ह बँकने इंटरचेंज फी 15 वरून वाढवून 17 रुपये एवढी केली आहे. तर बिगरआर्थिक ट्रांझॅक्शन फी 5 वरून 6 रुपये करण्यात आली आहे. बिगरआर्थिक ट्रांझॅक्शनमध्ये बँलेन्स तपासणे यासारख्या सोयी येतात. तेव्हा आता अशा ट्रांझॅक्शनसाठी सुद्धा ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत.
ग्राहकांना दर महिन्याला एटीएमच्या वापरासाठी मेट्रो शहरात मोफत मर्यादा तीन आहे तर अन्य भागात पाच आहे. मात्र त्यानंतर एटीएममधून केल्या जाणाऱ्या प्रत्येक व्यवहारासाठी शुल्क द्यावे लागते. या शुल्कात आता आरबीआयकडून वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मोफत व्यवहाराची मर्यादा ओलांडल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे.