दावडी – महाराष्ट्र राज्य व खेड तालुका पोलीस पाटील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खेड उपविभागीय अधिकारी संजय तेली यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस पोटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुक्यातील पोलीस पाटलांना एकत्रित संपर्कात राहता यावे, तसेच तालुक्यातील नागरिकांच्या काही समस्या असल्यास पोलीस पाटलांचे मार्गदर्शन मिळविण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी संपर्क कार्यालय करावे, अशी मागणी पोलीस पाटील कित्येक दिवस करीत होते.
याच अनुषंगाने पोलीस पाटील दिनाचे औचित्य साधत राजगुरूनगर शहरात हे संपर्क कार्यालय करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांनी दिली. या कार्यालयात पोलीस पाटलांचे कायदे, कर्तव्य आणि पोलीस व समाज याविषयी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, पुणे कार्यकारी अध्यक्ष राळे पाटील, महिला जिल्हा अध्यक्ष तृप्ती मांडेकर, तालुका अध्यक्ष अशोक चौधरी पाटील, जिल्हा अध्यक्ष गोरक्षनाथ नवले पाटील, पश्चिम अध्यक्ष दादा काळभोर पाटील, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रोहिदास शिंदे, जिल्हा सचिव बारवकर पाटील जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष आणि जिल्हा कमिटी व महिला आघाडी व खेड तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.