पुणे(प्रतिनिधी) – सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक व ड्रायव्हिंग प्रशिक्षकांसाठी सर्टिफिकेट कोर्सचे उदघाटन बुधवारी पार पडले. हा कोर्स सी.आय. आर. टी. पुणे, महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत करण्यात आला आहे.
या तीन दिवसाचा निवासी सर्टिफिकेट कोर्स चे उद्घाटन कॅप्टन डॉ. राजेंद्र सनेर पाटील (संचालक सी आय आर टी पुणे) यांच्या शुभहस्ते पार पाडले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेखर ढोले (सचिव वाहन चालन प्रशिक्षण संस्था कासारवाडी पुणे), डॉ अजित शिंदे (प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे), प्रशांत काकडे (सी एम डी सी सी आर टी पुणे) हे या मान्यवर उपस्थित होते.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांच्या संकल्पनेतून हा सर्टिफिकेट कोर्स प्रथमच सुरू झालेला आहे. यापूर्वी महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन यांच्यावतीने पाच बॅचेस पूर्ण झाले आहेत. ही सहावी बॅच आहे. यामध्ये आत्तापर्यंत एकूण 160 महिला आणि 110 पुरुष ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
महाराष्ट्र राज्यात ड्रायव्हिंग स्कूल संचालकांच्या एकूण वीस बॅचेस करण्यात येणार आहेत. यानंतर संपुर्ण राज्यात हा कोर्स आयोजीत केला जाईल . त्यात सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संचालक व त्यांचे प्रशिक्षक भाग घेतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी दिली.